
प्रेरणेचा सण • समाजातील कर्तृत्वाचा गौरव
१५ नोव्हेंबर २०२५
एम. आय. टी. प्रांगण, बीड बायपास रोड
छत्रपती संभाजीनगर
हा फक्त एक पुरस्कार सोहळा नाही.
दीपस्तंभ पुरस्कार सोहळा २०२५ हा मराठा समाज प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांचा प्रेरणादायी उपक्रम आहे ज्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. इथे केवळ गौरव नव्हे, तर एकत्र येऊन एकमेकांकडून शिकण्याची आणि प्रेरणा घेण्याची संधी आहे.
१५ नोव्हेंबर २०२५, एम. आय. टी. प्रांगण, छत्रपती संभाजीनगर हजारो समाजबंधूंनी उजळवलेला कर्तृत्वाचा दीप. चला, या प्रेरणेचा भाग बनूया.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान. प्रेरणेचा दीपस्तंभ.

प्रख्यात उद्योगपती

अध्यक्ष, ऑल इंडिया सर्जन असोसिएशन

सुप्रसिद्ध व अग्रगण्य चार्टर्ड अकाउंटंट

यशस्वी शेतकरी, कृषी व्यावसायिक

निष्णांत वाइल्डलाईफ फोटोग्राफर

क्राफ्ट बिअर उद्योजक
आऊसाहेब रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (AARTI)हा समाजातील शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी उभारला जाणारा अत्याधुनिक प्रकल्प आहे. या केंद्राचा उद्देश — प्रत्येक तरुणाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे.
ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना समान संधी देत, संशोधन, प्रशिक्षण आणि उद्योजकतेचा संगम निर्माण करणे हा AARTI चा मूलभूत हेतू आहे. येथे "शिका, वाढा आणि समाजाला दिशा द्या" हा संदेश प्रत्येक कृतीतून झळकतो.
३८,००० चौ. फुटांच्या विस्तीर्ण भूमीवर उभे राहणारे AARTI स्किल सेंटर — आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण सुविधा यांनी सज्ज.
समाजातील प्रत्येकाच्या योगदानातून साकार होणारा हा दीपस्तंभ — पुढील पिढ्यांसाठी ज्ञान आणि प्रगतीचा मार्ग उजळवेल.
AARTI बद्दल अधिक जाणून घ्या →



१५ नोव्हेंबर २०२५
रोजी एम. आय. टी. प्रांगण,
छत्रपती संभाजीनगर
आपली सहपरिवार उपस्थिती म्हणजे मराठा समाजाचे दिव्यदर्शन !